
अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील दीपनगर येथे भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील दीपक नगर येथून मयूर संजय पाटील वय 30 हे रिक्षा जवळून पायी जात होते. त्यावेळी भरता वेगाने येणारी चारचाकी वाहन क्रमांक (एमएच 18 bz 492) रस्त्यावरील रिक्षाला धडक दिली. त्यामुळे पायी जात असलेले मयूर पाटील यांना धडक बसली, त्यात ते जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील चालक प्रमोद कैलास पाटील रा. डोंगरगाव ता. शिंदखेडा जि. धुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस शेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहे.



