जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रायपूर येथील मयूरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने एक भव्य अध्यात्मिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजवळ कृतज्ञतेची भावना व्यक्त करत गुरुपौर्णिमेचा हा पारंपरिक आणि भावनिक दिवस वेगळ्याच शैलीत साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्या नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना पुष्प अर्पण करून नमन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका भारती परदेशी मॅडम यांनी गुरुपौर्णिमेचं महत्व विषद करताना मातापित्यांच्या भूमिकेवर विशेष भर दिला. “पालक हेच आपल्या आयुष्यातील पहिले गुरु आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचं प्रेम हीच खरी संपत्ती आहे,” असे सांगताना त्यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांचे मन जिंकले. त्यांनी मुलांना आपल्या पालकांप्रती कृतज्ञ राहण्याचा आणि त्यांचा आदर करण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध भाषणांद्वारे गुरुंचं महत्व स्पष्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला भक्तिपूर्ण वातावरण दिले, तर काहींनी गुरुशिष्य परंपरेवर आधारित नाटिका सादर केली.
शाळेतील शिक्षकवर्गानेही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. संपूर्ण आयोजनात सोनाली देसले मॅडम, मयुरी वाघ मॅडम, भावना परदेशी मॅडम, भावना मोरे मॅडम आणि गजेंद्र परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्यामुळेच कार्यक्रम सुरळीत व यशस्वी पार पडला.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेत साकारलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये नैतिक आणि अध्यात्मिक मूल्यांचं बीजारोपण केलं. गुरु आणि पालक यांचं महत्व पटवून देणारा हा कार्यक्रम अनेकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणारा ठरला.



