Home Cities अमळनेर शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरूणाने उचलले टोकाचे पाऊल !

शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरूणाने उचलले टोकाचे पाऊल !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पारळसरे येथे राहणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपविण्याची घटना बुधवार ९ जुलै रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. कामावर जाणासाठी बोलविण्यासाठी गेलेल्या आईला मुलाने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी आक्रोश करत हंबरडा फोडला. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सोपान महारू कोळी वय ३२, रा. पाडळसरे ता. अमळनेर असे मयत झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोपान कोळी हा आपल्या पत्नी आणि मुलाबाळांसह वास्तव्याला होता, आणि शेतीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. दरम्यान नेहमीप्रमाणे बुधवारी ९ जुलै रोजी सकाळी त्यांची पत्नी ह्या कामावर निघून गेल्या होत्या. त्यानंतर ते राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर एकटेच असतांना त्यांनी झोक्याच्या दोरीने गळफास घेतला होता. दरम्यान संदीप सोबत काम करणाऱ्या संदीप कोळी यांनी फोन त्यांच्या घरी भावाला फोन करून पाठवण्याचे सांगितले. त्यावेळी त्याला बोलवण्यासाठी सोपनची आई सीमाबाई या घराच्या वरच्या मजल्यावर गेला. त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. हे भयान चित्र पहताच त्यांनी एकच आक्रोश आणि हंबरडा फोडला होता. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. यावेळी मयत सोपानचा भाऊ ज्ञानेश्वर कोळी याने याने धागे त्याला खाली उतरवून तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान या संदर्भात मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परधी करीत आहे.


Protected Content

Play sound