Home Cities अमळनेर अमळनेर पोलीसांची कारवाई; फॉर्च्युनर, क्रेटा… चोरीच्या दोन गाड्या जप्त !

अमळनेर पोलीसांची कारवाई; फॉर्च्युनर, क्रेटा… चोरीच्या दोन गाड्या जप्त !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील ओमसाई श्रद्धा नगर येथून एका मारुती डिझायर कारची चोरी झाल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना, अमळनेर पोलिसांनी मध्य प्रदेशातून इतर ठिकाणाहून चोरीस गेलेल्या दोन वाहने जप्त केली असून (फॉर्च्युनर आणि क्रेटा) या वाहनांचा समावेश आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय वाहन चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाल्याचे मानले जात आहे.

२४ मे २०२५ रोजी रात्री प्रवीण हरिश्चंद्र ठाकूर यांच्या घरासमोरून त्यांची दीड लाख रूपये किंमतीची पर्पल पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी डिझायर (क्र. MH18 AJ3110) चोरीला गेली होती. त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते (अमळनेर) यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम (अमळनेर पोलीस स्टेशन) आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

या पथकाने, ज्यात पो.उप.नि. नागदेव बोरकर, पो.शि. विनोद संदानशिव, पो.शि. निलेश मोरे, पो.शि. प्रशांत पाटील आणि पो.शि. उज्ज्वलकुमार म्हरके यांचा समावेश होता, ६ जुलै २०२५ रोजी मध्य प्रदेशात खाना केले. ७ जुलै रोजी त्यांना मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील सितामउ तालुक्यातील रावठी गावात संशयित आरोपी राहुल पाटीदार याच्या घरामागील गोडाऊनमध्ये चोरीचे वाहन लपवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

सितामउ पोलिसांच्या मदतीने राहुल पाटीदारच्या घराची व गोडाऊनची झडती घेतली असता, तिथे अमळनेरमधून चोरी झालेल्या डिझायर कारसोबतच इतर दोन चोरीची वाहने आढळून आली. यात ३५ लाख रूपये किंमतीची पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर (क्र. CG10 BL6776) आणि १२ लाख रूपये किंमतीची पांढऱ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार (क्र. MP04 ZL2963) यांचा समावेश होता. या दोन्ही वाहनांचे चेसिस आणि इंजिन नंबर नष्ट करण्यात आले होते. फॉर्च्युनर नागपूर (शहर) येथील राणाप्रताप नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आहे तर क्रेटा जळगाव (तालुका) पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा असल्याचे निष्पन्न झाले आहे. जप्त केलेली सर्व वाहने अमळनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहेत. या यशस्वी कारवाईमुळे आंतरराज्यीय वाहन चोरांच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.


Protected Content

Play sound