मुंबई वृत्तसेवा । शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये राडा करत कॅन्टीनवाल्याला मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत संजय गायकवाड म्हणाले की, मी रात्री 9.30 वाजता डाळ, वरण, भात, चपातीची ऑर्डर दिली. पहिला घास खाल्ल्यावर मला खूप घाणेरडं वाटलं. तर दुसरा घास खाल्ल्यावर उलटी झाली. वरणाला खूप भयंकर वास येत होता. पॉयजन सारखा हा प्रकार होता. भात शिळा होता. याआधी तीन वेळा असं जेवण आल्यानंतर मी मालकाला समज दिली. जे वरण दिलं, ते चार-पाच दिवसापूर्वीच आहे. तुम्ही वास घेऊन पाहू शकता. वारंवार सांगून हे ऐकत नसतील, मराठी-हिंदी समजत नसेल, तर आम्हाला आमच्या स्टाइलमध्ये उत्तर द्यावं लागेल. अशा प्रकारे आमदारांच्या, जनतेच्या जिवाशी खेळणारे कॅन्टीनवाले असतील, तर गय करणार नाही” असा इशारा गायकवाड यांनी दिला.

तर अनेकांनी संजय गायकवाड यांच्यावर या प्रकरणी टीका केली आहे.



