Home Uncategorized अव्वल कारकुनासह पंटर एसीबीच्या जाळ्यात

अव्वल कारकुनासह पंटर एसीबीच्या जाळ्यात

0
50


भुसावळ प्रतिनिधी । रेशन दुकानदाराकडून लाच स्वीकारतांना येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनासह त्याच्य पंटरला आज एसीबीने सापळा रचून रंगेहात पकडले.

याबाबत माहिती अशी की, येथील एका रेशन दुकानदाराकडे तहसील कार्यालयातील अव्वल कारकून म्हणून कार्यरत असणार्‍या प्रफुल्ल कांबळे याने ७३ रेशन कार्ड धारकांचे आधार सिडींग करण्यासाठी सुरुवातीला ५०० व नंतर ७०० रुपयांप्रमाणे एकूण ५१ हजार १०० रुपयांची मागणी केली होती. यातील सुरुवातीला अर्धी रक्कम २६ हजार रुपये मंगळवारी देण्याचे सांगितले होते. तक्रारदाराने याबाबत जळगाव एसीबीकडे दोन दिवसांपूर्वी तक्रार केली होती. या अनुषंगाने आज सायंकाळी अव्वल हिशोब कारकुन प्रफुल्ल पांडुरंग कांबळे (३९, विमल पाटील नगर, भुसावळ) याने खाजगी पंटर रहिम मो.गवळी (अन्सार उल्ला नगर, भुसावळ) यांच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पथकाने त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निलेश लोधी, महेश सोमवंशी, अरुण पाटील, ईश्‍वर धनगर, नासीर देशमुख आदींच्या पथकाने केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound