Home क्राईम पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हुंडा कमी दिला तसेच दुकान टाकण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपयांची मागणी करत इंद्रप्रस्थ नगरातील विवाहितेला सासरी बामणोद येथे सासरी मारहाण करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी ६ जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील माहेर असलेल्या गायत्री देवेंद्र सोनवणे वय २४ यांचा विवाह देवेंद्र बाळू सोनवणे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेले आहे. दरम्यान लग्नात हुंडा कमी दिला तसेच पतीला किराणा दुकान टाकण्यासाठी पाच लाख रूपये आणावे अशी मागणी करत विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. त्यानंतर सासू, सासरे ननंद यांनी शारिरीक व मानसिक छळ करून जीवेठा मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून गेल्या. त्यानंतर त्यांनी रविवारी ६ जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती देवेंद्र बाळू सोनवणे, सासू संगीता बाळू सोनवणे, चुलत सासरे राजेंद्र सादशिव सोनवणे तिन्ही रा. बामणोद ता. यावल, नणंद उज्ज्वला गोपाल तायडे आणि नंदोई भाई गोपाल ज्ञानेश्वर तायडे रा. खामखेडा ता. मुक्ताईनगर याच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रफुल्ल धांडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound