Home Cities जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ७३ अर्जांची नोंद

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ७३ अर्जांची नोंद

0
177

 

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी ७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ७३ अर्ज प्राप्त झाले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दुपारी १ वाजता दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी ७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थिती हा कार्यक्रम घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी तक्रारदारांशी संवाद साधला असून त्यांचे तक्रारींचे निरसण केले आहे. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, तहसीलदार डॉ.उमा ढेकळे, नायब तहसीलदार राहुल सोनवणे, इतर शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी विविध प्रश्नांसंदर्भात अर्ज सादर केले असून, त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.


Protected Content

Play sound