मुंबई प्रतिनिधी । उच्च न्यायालयाने आज रात्रीपर्यंत संप मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम असल्याने नवीन पेच निर्माण झाला आहे.
बेस्ट कर्मचार्यांच्या संपामुळे मुंबईकर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यामुळे कालच उच्च न्यायालयाने कर्मचार्यांनी संप मागे घेऊन वार्तालाप करण्याचे निर्देश दिले. मात्र कर्मचार्यांनी याला मानले नाही. यानंतर आज पुन्हा उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. यात न्यायालयाने आज रात्रीपर्यंत संप मागे घेण्याचे निर्देश दिले. मात्र हे निर्देश झुगारून लावत कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामुळे आता संप मिटवण्याच्या प्रयत्नांमध्ये अडसर निर्माण झाला असून हे प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत.