रावेर/भुसावळ प्रतिनिधी । परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजीच्या दर्शनाकरिता देशभरातून हजारो भाविकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त तालुक्यातील पाल येथील श्री वृदांवन धाम आश्रमात दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहे.
गुरुपौर्णिमेच्या पावन प्रसंगी पाल येथे परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी स्थापित श्री वृन्दावन धाम आश्रमात दि. १६ जुलै रोजी सकाळी ०५ वाजेपासुन श्री हरिधाम मंदिरात स्थित पूज्य बापूजीच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रिघ लागली. सकाळी ७ वाजेला पदस्थ संत श्री गोपाल चैतन्य बापूजी च्या सानिध्यात पादुका पूजन, आरती व अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारातर्फे ध्वजाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर गुरुदीक्षा, श्रद्धावचन तसेच सत्संग अमृताचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आश्रमात भाविकांनाकरिता पर्यटन विकास योजने अंतर्गत 60 लाखाचा निधी पुलाकरिता आ. हरिभाऊ जावले यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर भक्त निवासकरिता 35 लाख, तसेच आ. राठोड यवतमाळ यांच्या आमदार निधीतून 20 लाख मंजूर, खासदार रक्षाताई खडसे यांच्या निधीतून सत्संग पंडालकरिता 25 लाखचा निधी मंजूर करण्यात आला असून याचे भूमिपूजन माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
गुरुपौर्णिमेच्या पावनप्रसंगी आश्रमचे विद्यमान गादीपती श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या अमृत वाणीचा लाभ साधक परिवारांनी घेतला. त्यामध्ये बाबाजी पुढे म्हणाले की, गुरुविना भवसागर मनुष्य पार होऊ शकत नाही. परमेश्वर हे गुरूच्या नजिक असतात. तर गुरुच्या सनिध्यात शिष्य राहिल्यास त्याचा उद्धार नक्कीच आहे. गुरुच्या मार्गदर्शनाने शिष्याला भविष्याची योग्य दिशा कळते व चांगले गुण अंगी घेतल्यास परमेश्वराची प्राप्ती होते, असे भाविकांना संबोधीत केले आहे. आमदार हरिभाऊ जावळे यांनी श्रद्धावचनात माजी महसूल मंत्री नाथाभाऊ मंत्री असतांना चैतन्य कुंभसोहळा २०१४ साली पालला परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजीच्या नावानी फलोद्यान महाविद्यालय याची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते. ते अपूर्ण असलेले कार्य येणाऱ्या काळात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर माजी महसूल मंत्री यानी पूज्य बापूजीचे आशीर्वाद माझ्यावर असून याचे परतफेड करण्याकरिता ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या ग्रामविकास पर्यटन निधीतुन पाल आश्रमाकरिता एक कोटीचा विकासकामाला मंजूर करुण आणणार असल्याचे आश्वासन उपस्थित हजारो भाविकांना दिले आहे. यावेळी माजी आमदार शिरिष चौधरी, अनिल चौधरी, भीकनगांव मध्यप्रदेशाचे आमदार झुमा सोलंकी, खासदार प्रतिनिधी नंदा ब्राम्हणे, माजी आमदार धुरसिंग डावर, रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, औरंगाबादचे मारुती, राजस्थान समितीचे रामअवतार, पंजाबचे नवतेज जी ओलखा, तसेच अमोल पाटिल, पी.के. महाजन, यावलचे हर्षल पाटील, रावेरचे पद्माकर महाजन, यावलचे हिराभाऊ चौधरी, माजी शिक्षण अधिकारी एस.के.पवार, पालचे कामिल तड़वी, उपसरपंच राजू चौधरी, माजी सरपंच अर्जुन जाधव, ईस्माइल तड़वी, रघुनाथ चव्हाण आदि उपस्थितीत होते.