Home क्राईम जळगावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
176


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमीष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना १७ मे रोजी मध्यरात्री २ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी १८ मे रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १७ मे रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.


Protected Content

Play sound