Home धर्म-समाज यावल येथे तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरात वृक्षारोपण

यावल येथे तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरात वृक्षारोपण

yawal news
yawal news

yawal news

यावल प्रतिनिधी । यावल तालुका शेतकी खरेदी विक्री संघाच्या वतीने ‘झाडे लावा झाडे जगवा’ या राष्ट्रीय अभीयांनांतर्गत वृक्षरोपण संचालकांच्या हस्ते करण्यात आली.

यावल येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरात १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता खरेदी विक्री संघाचे चेअरमन रामदास पाटील, व्हाईस चेअरमन नितिन भाऊ नेमाडे, काँग्रेस पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद तथा खरेदी विक्री संघाचे संचालक प्रभाकर सोनवणे, संचालक ह.भ.प. नरेन्द्र नारखेडे, गणेश नेहते, केतन किरंगे, अमोल भिरूड, यशवंत तळेले, तेजस पाटील, उमेश फेगडे, भाजपाचे पदाधिकारी मोहराळा येथील लहु पाटील, इतर संचालक व कार्यकर्ते शेतकी संघाचे व्यवस्थापक कांतीलाल गाजरे, वरीष्ठ लेखापाल सुरेश यावलकर, रामचंद्र भोईटे, मयुर बोरोले इतर कर्मचारी याप्रसंगी उपास्थित होते. यावेळी शेतकी संधाच्या परिसरात विविध जातीच्या सुमारे १०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.


Protected Content

Play sound