
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर-यावल मतदारसंघाचे लोकप्रिय आ.अमोल जावळे यांच्या सूचनेची प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. त्यानुसार, रावेर आणि यावल तालुक्यात शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार नोंदणी करण्यासाठी आता गावपातळीवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावल आणि रावेर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांसाठी वारंवार यावल तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन आ.अमोल जावळे यांनी महसूल प्रशासनाला नागरिकांसाठी गावपातळीवरच दाखले उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती.
आमदारांच्या या सूचनेची दखल घेत, यावल तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, येत्या ७ मे ते २६ मे या कालावधीत यावल तालुक्यात एकूण ९ ठिकाणी आधार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय 1 दिव्यांग निवृत्ती वेतन योजना 2 आणि इतर सामाजिक लाभाच्या योजनांमधील लाभार्थ्यांचे डिजिटल पोर्टलवर आधार रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.


