Home क्राईम धरणगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

धरणगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
158


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका १५ वर्षे अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी ५ मे रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान पीडित मुलगी ही घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने दिला फूस लावून पळवून नेले आहे. दरम्यान या संदर्भात तिच्या नातेवाईकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यानुसार सोमवारी ५ मे रोजी दुपारी ३ वाजता पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील लोहार करीत आहे.


Protected Content

Play sound