Home क्राईम ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार करून जखमी

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार करून जखमी

0
111

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळकडे जात असलेल्या दुचाकीस्वार दिलीप पूना बारी (वय ४४, रा. भुसावळ) या तरुणाला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाले होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शुक्रवारी २ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ट्रकचालकाविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भुसावळ येथील दिलीप बारी हे २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास (एमएच १९, सीडी ४१५९) ने जात असतांना भुसावळकडे जात असतांना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दिलीप बारी हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार ट्रक चालकाविरुद्ध शुक्रवारी २ मे रोजी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे करीत आहे.


Protected Content

Play sound