Home क्राईम हुंडा म्हणून पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

हुंडा म्हणून पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

0
120

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील तंट्या भिल येथील माहेर असलेल्या विवाहितेला शास्त्री लोहारा येथे 50 हजारांसाठी साठी शारीरिक व मानसिक छळ करत शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील तंट्यापिल येथील माहेर असलेल्या पूनम संदीप पवार वय 22 यांचा विवाह पाचोरा तालुक्यातील लोहारा गावातील संदीप विलास पवार यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतरच विवाहितेला माहेराहून 50 हजार रुपये हुंडा म्हणून मागणी केली. परंतु विवाहितेच्या आई-वडिलांची परिस्थिती हालाखीची असल्या कारणामुळे त्यांनी पैसे आणले नाही, विवाहितेला शिवीगाळ करत धमकी दिली. या त्रासाला कंटाळून विवाहितता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवार 29 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता पती संदीप विलास पवार, सासू अंजना विलास पवार, नंदोईभाऊ दीपक ईश्वर गायकवाड, नणंद मनीषा दीपक गायकवाड सर्व रा.लोहारा ता. पाचोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे करत आहे.


Protected Content

Play sound