Home Cities जळगाव जळगावकर अनिल राणेंची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई !

जळगावकर अनिल राणेंची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई !


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रामदास कॉलनीतील अनिल राणे यांनी जगातील सर्वात खडतर आणि लोकप्रिय ट्रेक्सपैकी एक मानल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकची यशस्वी पूर्तता करून जिद्द, चिकाटी आणि मानसिक बळ याचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. २५ एप्रिल रोजी त्यांनी हा ट्रेक पूर्ण केला.

काठमांडूपासून सुरु होणारा आणि परत
काठमांडूपर्यंत असणारा हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी त्यांना एकूण १४ दिवस लागले. दरम्यान, -२० अंश सेल्सिअस तापमान, फक्त ८-१० टक्के ऑक्सिजन असलेले विरळ वातावरण, बर्फवृष्टी, हिमनद्यांवरून चालणे आणि खडबडीत पर्वतीय भूप्रदेश यामुळे हा ट्रेक अत्यंत कठीण बनला होता. मात्र या सर्व अडचणींवर मात करत श्री. राणे यांनी यशाचे शिखर गाठले.

ते सतीश राणे यांचे धाकटे भाऊ असून फिटनेस आणि साहस प्रेमासाठी ते ओळखले जातात. दरवर्षी १० किमी मॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्या श्री. राणे यांनी यंदा २५ फेब्रुवारी रोजी मुंबईत झालेल्या पिंक सिटी मॅरेथॉनमध्ये वरिष्ठ नागरिक विभागात तिसरा क्रमांक मिळवला होता.

त्यांच्या या दुर्मीळ आणि प्रेरणादायक कामगिरीबद्दल मित्रमंडळी, नातेवाईक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. योग शिक्षक सुनील गुरव यांनीसुद्धा त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound