Home Cities जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

0
193


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जळगाव येथील नियोजन भवन सभागृहात दि.14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री जळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक समता, बंधुता व न्यायाच्या मूल्यांना मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे.

यानिमित्त कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित केला आहे तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वाटप करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतिनिमित्त अभिवादन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त,समाज कल्याण जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound