Home क्राईम भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

0
145


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील गेंदलाल मिल परिसरामध्ये पायी जात असलेल्या एका प्रौढ व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी 8 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता घडली आहे. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुभाष पुन्हा सपकाळे (वय 53, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, सुभाष पुना सपकाळे हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. लाकूडपेठ येथील स्वामील कंपनीत हमाली म्हणून ते कामाला होते. मंगळवारी 8 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता ते रस्त्याने पायी जात असताना त्यांना भरदा दुचाकीने जोरदार धडक दिली या धडकेत ते गंभीर जखमी झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा रात्री 11 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत जळगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, दोन मुलं, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.


Protected Content

Play sound