Home Cities चोपडा गुजराथी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

गुजराथी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

0
31
school udghatan

school udghatan

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील घोडगाव येथील सी.बी.निकुंभ विद्यालय परीसरात शेठ नटवरलाल रणछोडदास गुजराथी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नवीन इमारतीचे आज भूमिपुजन करण्यात आले.

नवीन इमारतीचे भूमिपूजन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरूणभाई गुजराथी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत अधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी कोसोदे, माजी आमदार जगदीश वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी शालेय परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांनी केले.यावेळी दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अविनाश ढाकणे यांनी आपल्या मनोगतात इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व सांगितले. अरुणभाई गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बिर्‍हाडे सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य, मुख्याध्यापक आर.पी.चौधरी, पर्यवेक्षक एस.बी.अहिरराव, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.


Protected Content

Play sound