रावेर(प्रतिनिधि) : वादी व प्रतिवादी यांनी सामोपचाराने आपले वाद मिटवून वेळ आणि पैसा याची बचत करावी असे आवाहन न्यायाधीश तथा विधी सेवा समिती अध्यक्ष आर. एल. राठोड यांनी केले आहे ते रावेर तालुका विधी सेवा समितीमार्फत आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. दीपप्रज्वलन सह न्या. आर. एम. लोळगे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष विनोद कोंघे, उपाध्यक्ष जगदीश महाजन, सचिव बी. डी. निळे, डी. ई. पाटील, व्ही. पी. महाजन, प्रवीण पाचपोहे, आर. एन. चौधरी, योगेश गजरे, सुभाष धुंदले, विपीन गडे , लक्षमण शिंदे, आर. ए. पाटील, सलीम जामलकर, रमाकांत महाजन, शितल जोशी, सुधाम सांगळे, सरकारी वकील वारुळे आदी उपस्थित होते. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वाद पूर्व प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व वकील व लोकन्यायालयात पंच एस. बी. महाजन, नगिनदास इंगळे तर वीज वितरण कंपनी, बीएसएनएल विभाग, नगरपालिका सावदा व रावेर चे प्रतिनिधी उपस्थित होते. या लोक न्यायालयात वाद पूर्व प्रकरणात ५३ गावातील ६ हजार १५३, बीएसएनएल १७७, रावेर नगरपालिका ६३, सावदा नगरपालिका ५४, वीज वितरण कंपनी २० आदींसह कोर्ट नियमित प्रकरणे सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३२४ प्रकरणे निकाली काढण्यात आलीत. यात १० लाख ३८ हजार ८३४ रुपयांची वसूली करण्यात आली तसेच न्यायालयातील न्याय प्रलंबित १९२ प्रकारने तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती त्यापैकी १९ प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवीण्यात आली त्यातुन ६ लाख ९१ हजार रक्कम वसूली करण्यात आली.