Home Cities अमळनेर मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांना ‘सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित

मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांना ‘सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित

0
243

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर: पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांना शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल ‘इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड’ संस्थेच्या वतीने ‘सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मुंबईतील पवई येथील हिरानंदानी गार्डन येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड संस्थेने २०२४-२५ या वर्षासाठी हा पुरस्कार दिला आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून अनेक अर्ज आले होते. जे.एस. देवरे यांची २८ वर्षांची शैक्षणिक कारकीर्द आणि त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी यांचा विचार करून त्यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले.

हा पुरस्कार भारतातील पहिल्या महिला आय.पी.एस. अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. किरण बेदी आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासोबतच जे.एस. देवरे यांना तीन हजार रुपयांचा धनादेशही देण्यात आला. या पुरस्कारामुळे जळगाव जिल्हा आणि अमळनेर शहराचा गौरव वाढला आहे. जे.एस. देवरे यांच्या कार्यामुळे इतर मुख्याध्यापकांनाही प्रेरणा मिळेल. पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन प्रदीप अग्रवाल आणि संस्थेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी जे.एस. देवरे यांचे अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound