Home व्हायरल मसाला हवामान खात्याची खिल्ली उडविणारा ‘हा’ व्हिडीओ झालाय व्हायरल !

हवामान खात्याची खिल्ली उडविणारा ‘हा’ व्हिडीओ झालाय व्हायरल !

0
29
shetkari video

shetkari video

मुंबई प्रतिनिधी । हवामान खात्याची सोशल मीडियातून नेहमीच टिंगली उडवली जात असते. या अनुषंगाने जयाजीराव सूर्यवंशी शेतकरी नेत्याने या खात्याची खिल्ली उडविणारा व्हिडीओ शेअर केला असून तो सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे.

हवामान खात्याचे अंदाज फारसे खरे ठरत नसल्यामुळे अनेकदा टिकेचे लक्ष्य होत असतात. यातच आता जयाजीराव सूर्यवंशी या शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. यात सूर्यवंशी यांनी हवामान खात्यापेक्षा नंदीबैल बरा अशी मल्लीनाथी करत या खात्याची टिंगल उडविली आहे. जयाजीराव सूर्यवंशी हे शेतकरी नेते असून त्यांनी पुणे येथील हवामान खात्याच्या कार्यालयासमोर बोर्ड लाऊनदेखील आपला निषेध व्यक्त केला आहे.

पहा : जयाजीराव सूर्यवंशी यांनी शेअर केलेला व्हिडीओ.

https://www.facebook.com/jayajirao.suryawanshi/videos/2414472848816173/


Protected Content

Play sound