Home Cities जळगाव भंगाळे विद्यालयाच्या विद्यार्थी वारकऱ्यांनी वेधले लक्ष (व्हिडिओ )

भंगाळे विद्यालयाच्या विद्यार्थी वारकऱ्यांनी वेधले लक्ष (व्हिडिओ )

0
22
WhatsApp Image 2019 07 12 at 6.23.07 PM
WhatsApp Image 2019 07 12 at 6.23.07 PM

WhatsApp Image 2019 07 12 at 6.23.07 PM

जळगाव, प्रतिनिधी | युवा विकास फाऊंडेशन संचालित सिताबाई गणपत भंगाळे माध्यमिक विद्यालय, आप्पासाहेब जे. एस. शिंदे प्राथमिक विद्यालय व शिशुविकास बालक मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली होती.

 

या पालखीचे मानकरी हे माजी महापौर तथा फाऊंडेशनचे अध्यक्ष विष्णू भंगाळे हे होते. विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर, विठ्ठल नामाचा गजरात सुरक्षा नगर परिसर दणाणून सोडला. पालखी पुन्हा भंगाळे शाळेत परतली. या दिंडीत विठ्ठल- रुक्मिणी आणि वारकरी यांच्या वेषभूषेमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. विठ्ठल रुखमणीच्या वेषातील बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ठीक ठिकाणी या पालखीचे महिला पूजन करतांना दिसत होत्या.

 

 


Protected Content

Play sound