Home Cities जळगाव डीपीडीसीच्या सदस्यपदी जैस्वाल व ॲड. सोनवणे यांची निवड

डीपीडीसीच्या सदस्यपदी जैस्वाल व ॲड. सोनवणे यांची निवड


chopda nivad

चोपडा प्रतिनिधी । जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी)च्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी भाजपाचे नगरसेवक गजेंद्र जैस्वाल आणि शिवसेनेचे ॲड.एस.डी. सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गजेंद्र जैस्वाल हे पालकमंत्री ना.गिरिश महाजन आणि खासदार रक्षा खडसे मित्र परिवारातील तर अॅड.एस.डी.सोनवणे हे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या परीवारातील आहेत. जिल्ह्यातील १४ सदस्यांची निवड यादीचे आदेश नियोजन विभागाचे उपसचिव वि.फ.वसावे यांनी नुकतेच पारीत केले आहे.


Protected Content

Play sound