जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शुक्रवार १२ जलै रोजी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एक हजार झाडे लावली.
महाराष्ट्र शासनाने जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात ३३ कोटी वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार शुक्रवारी विद्यापीठात चार गटांमध्ये विभागणी करून दिक्षांत सभागृह ते मुलींचे वसतिगृह, गांधी टेकडीचा परिसर, ग्रंथालय आदी परिसरात शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्ष लावले. कुलगुरु प्रा. पी.पी.पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करुन या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
यावेळी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य डी.एस.सुर्यवंशी, प्रा.ए.बी.चौधरी, प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी सोमनाथ गोहिल, प्रा.डी.एस.पाटील, विद्यापीठ उप अभियंता आर.आय.पाटील, कनिष्ठ अभियंता पी.टी. मराठे आदी उपस्थित होते. यावेळी पळस, निंब, चिंच, गुलमोहर, बेल, रेनस्ट्री, पेल्डफार्म आदी प्रकारचे एक हजार झाडे लावण्यात आली.