
सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भोरगाव लेवा पाटीदार पंचायत, ठाया पाडळसे यांच्या वतीने फैजपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीची छेडखानी करणाऱ्या आरोपींवर कठोर करवाई करा अशी मागणी केली.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या संतापजनक आणि निंदनीय घटनेतील आरोपींना प्रशासनाने तातडीने अटक करून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी करण्यात आली. अशा विकृतींना आळा बसण्यासाठी हे आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. हे निवेदन ललितकुमार पाटील (कुटुंबनायक, भोरगाव लेवा पंचायत) यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.


