Home क्राईम धक्कादायक : उर्दू शाळेत महिला शिक्षिकेचा विनयभंग; मुख्याध्यापकासह एकावर गुन्हा

धक्कादायक : उर्दू शाळेत महिला शिक्षिकेचा विनयभंग; मुख्याध्यापकासह एकावर गुन्हा


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात असलेल्या उर्दू शाळेतील ४२ वर्षीय महिला शिक्षिकेला धक्काबुक्की करून अश्लिल शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना उघडकीला आला आहे. या संदर्भात बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता शाळेचे चेअरमन आणि मुख्याध्यापक या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी कीख्, जळगाव शहरातील एका भागात असलेल्या उर्दू शाळेत ४२ वर्षीय महिला शिक्षिका नोकरीला आहेत. २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यानच्या काळामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेचे चेअरमन या दोन दोघांनी महिला शिक्षिकेला धक्काबुक्की करून त्यांच्या मनात लज्ज उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. तसेच त्यांना अश्लिल शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच अनेक वेळा त्यांना शाळेत शिकवत असताना त्यांचा विनयभंग करण्यात आला आहे. दरम्यान या त्रासाला कंटाळून महिला शिक्षिकेने अखेर गुरुवारी २६ फेब्रुवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार या शाळेचे मुख्याध्यापक आणि चेअरमन या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound