Home क्राईम मोठी बातमी : पिकअप व्हॅन पलटी; १८ मजूर जखमी !

मोठी बातमी : पिकअप व्हॅन पलटी; १८ मजूर जखमी !


जळगाव/यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील भालोद गावाजवळ शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एका पिकअप व्हॅनला अपघात झाला. मजुरांनी भरलेली ही व्हॅन अचानक पलटी झाल्याने १८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत मजुरांचा यात समावेश आहे.

 

अधिक माहिती अशी की, हिंगोणा येथून काही मजूर हरभरा कापणीसाठी भालोद येथे जात होते. भालोद गावाच्या पुढे त्यांची पिकअप व्हॅन अचानक पलटी झाली. या अपघातात शारदा मुंगीलाल बारेला (वय १०), दिपाली जगदीश बारेला (वय ८), मंगू जगदीश बारेला (वय २०), प्रमिला सयाराम बारेला (वय २१), आनंद सखाराम बारेला (५ महिने), उमेश जगदीश बारेला (वय १२ वर्षे), सखाराम गुजरिया बारीला (वय २०), ममता मांगीलाल बारेला (वय १२), संदीप मांगीलाल बारेला (वय ६), राणू मांगीलाल बारेला (वय ४), दिलीप बारेला (वय १८ वर्षे), कविता तापा बारेला (वय ५ वर्षे), गोदीबाई बारेला (वय ४२ वर्षे), सविता बारेला (वय ४६ वर्षे), नीरसा मांगीलाल बारीला (वय ३० वर्षे), दिनेश वैद्या बारेला (वय १२), जगदीश बारेला (वय २५) सर्व रा. हिंगोणा ता. यावल असे १८ जण जखमी झाले आहे.

१८ मजूर गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने शासकीय रुग्णवाहिकेमधून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, सीएमओ डॉ. स्नेहल दुगड, डॉ. निखिल तायडे, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. रोहन पाटील, डॉ. अमोल पाटील, डॉ. निलेश पाटील, डॉ. जिया उल हक, डॉ. किरण सोंडगे यांच्या वैद्यकीय पथकाने जखमींवर तातडीने उपचार सुरू केले. गोदीबाई बारेला यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. यावल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound