नगरपालिकेचा भुसावळकरांच्या जीवाशी खेळ- नेमाडे ( व्हिडीओ )

umesh nemade

भुसावळ प्रतिनिधी । तापी नदीत विपुल पाणी असतांनाही शहरवासियांना वेळेत पाणी पुरवठा न करता, नागरिकांच्या जीवाशी नगरपालिकेचा खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केला आहे.

भुसावळकरांना यंदा अभूतपुर्व पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे. उन्हाळ्यात हतनूरमधील आवर्तनानुसार विलंबाने पाणी पुरवण्यात आले. आता पावसामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत असतांनाही शहरवासियांना वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याबद्दल आज माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, दहा दिवसानंतरही नागरिकांना पाणी दिले जात नसून नगरपालिका प्रशासन हे भुसावळकरांच्या जीवाशी खेळत आहेत. याबाबत आवाज उठवला असता नगराध्यक्षांना आम्ही हे सारे प्रसिध्दीसाठी करत असल्याचा साक्षात्कार होतो. मात्र आम्ही बरेच काही कामे करत असल्यामुळे आम्हाला प्रसिध्दीची आवश्यकता नसल्याचा टोला मारत त्यांनी पाणी पुरवठा सुरळीत नसल्याबद्दल नगरपालिकेला धारेवर धरले.

पहा : उमेश नेमाडे यांच्या आरोपांची सरबत्ती असणारा व्हिडीओ.

Protected Content