भुसावळ प्रतिनिधी । येथील रेल्वे यार्डात आज सकाळी मालगाडीचे डबे घसरून पडले. मात्र यात सुदैवाने हानी झाली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी मालगाडीचे डबे रूळांवरून घसरले. नेमके कशामुळे हा प्रकार घडला याची माहिती समोर आली नाही. तथापि, डबे घसरून पडल्यामुळे मोठा आवाज झाला. अधिकार्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून डबे उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.