जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी शंभर रुपये दिले नाही या रागातून एका तरुणाला शिवीगाळ करून मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जैनाबाद येथील बगीच्या जवळ घडली आहे. या संदर्भात दुपारी १३.३० जता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जळगाव शहरातील जैनाबाद येथे नितीन उर्फ नाना ज्ञानेश्वर काळे वय-३० हा तरुण त्याचा मित्रासोबत जैनाबाद येथील बगीच्या जवळ उभा होता. त्यावेळी श्याम सूर्यवंशी हा नितीन जवळ आला आणि त्यांनी दारू पिण्यासाठी १०० रुपये मागितले, दरम्यान नितीनने त्याला पैसे दिले नाही, या रागातून श्याम सूर्यवंशी याने शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. या संदर्भात दुपारी १.३० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात श्याम सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या संदर्भात पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम बोरसे करीत आहे.


