जळगाव (प्रतिनिधी): सामाजिक कार्यकर्त्या इंदुबाई महिला बहुद्देशीय मंडळ व रणरागिणी ग्रुप च्या संस्थापक अध्यक्षा ,महिला दक्षता समिती सदस्या मंगला सोनवणे यांची “छावा मराठा युवा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी” नियुक्ती जिल्हाअध्यक्ष अमोल कोल्हे यांच्याहस्ते करण्यात आली आहे.
मंगला सोनावणे यांनी वाल्मिक नगर भागात अवैधरित्या होणाऱ्या दारू निर्मिती व विक्री विरोधात यशस्वी आंदोलन केले आहे . गणेशोत्सवादरम्यान व इतरही वेळी रणरागिणी ग्रूपच्या महिला बंदोबस्त कामी पोलिसांना मदत करीत असतात. यासह अनेक समाज उपयोगी कार्य व अन्यायाला प्रतिकार त्या करतात.त्यांच्या या नियुक्ती बद्दल महासंघाचे संस्थापक धनाजी येळकर पाटील यांनी अभिनंदन केले आहे. नियुक्ती करतांना महानगराध्यक्ष प्रशांत फाळके , विद्यार्थी आघाडीचे उ.म. अध्यक्ष य पाटील ,. राजकिरण चौधरी , जाधव साहेब व ताईंच्या सहकारी महिला मंडळाच्या भगिनी उपस्थित होत्या.