Home क्राईम यावल वन विभागाच्या कारवाईत सागवान जातीचे लाकूड जप्त

यावल वन विभागाच्या कारवाईत सागवान जातीचे लाकूड जप्त


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील यावल वनविभागाच्या कार्यवाहीत वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील गस्ती पथक यावल यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारावर कोरपावली तालुका यावल या गाव परिसरात गस्त करून तपास केला असता पाला पाचोळ्यात लपवलेले साग कट साईज नग – ६ घ. मी. ०.११२ माल किम्मत सुमारे २२६६ /- किमतीचे सागवान जातीचे कट साईज लाकुड मिळून आले.सदर गुन्हे कामी वनपाल गस्ती पथक यांनी प्र. रि. क्रमांक ०२ /२०२५ दिनांक २९ जानेवारी २०२५ नोंदविला जप्त माल मुख्य विक्री केंद्र यावल येथे जमा केला.

सदरची ही कार्यवाही जमीर शेख साहेब, उप वनसंरक्षक,यावल वन विभाग जळगाव व आर.आर. सदगीर, विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे तसेच प्रथमेश हळपे (सहाय्यक वन संरक्षक चोपडा ) व समाधान पाटील (सहाय्यक वन संरक्षक यावल वन विभाग जळगाव) यांच्या मार्गदर्शना खाली सदरची कारवाई ही वनपरिक्षेत्र अधिकारी गस्ती पथक यावल स्व. म. फटांगरे, आर. एम. जाधव वनपाल, आर. व्ही. ख़र्चे वनपाल, बी. बी. गायकवाड आगार रक्षक यावल, सचिन तडवी पोलीस कांस्टेबल, वाय. डी. तेली वाहन चालक यांनी केली.


Protected Content

Play sound