जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पूर्व संध्येला गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित व परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में है दम’ हा संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन महात्मा गांधी उद्यान येथे आज दि. २९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सादर झाला.


महात्मा गांधी यांचे अनेक अपरिचीत पैलू व त्यांच्याविषयी असलेले अनेक समजगैरसमज याचा शोध घेणारा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशन महात्मा गांधी यांच्या जीवनावर व कार्यावर नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. याच धोरणाच्या अंतर्गत पुण्यतिथीच्या निमित्ताने परिवर्तनच्या कलावंतांसोबत हा कार्यक्रम सादर करण्यात आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कऱण्यात आहे. या वेळी व्यासपीठावर समाज कल्याण विभागाचे उपआयुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, डॉ राधेश्याम चौधरी, डॉ. जोशी अनिल कांकरिया उपस्थित होते
या कार्यक्रमाची संकल्पना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची होती. दिग्दर्शक नारायण बाविस्कर तर संगीत दिग्दर्शक मंजूषा भिडे, वेशभूषा प्रतिक्षा कल्पराज, रंगभूषा निलिमा जैन आणि बिना मल्हारा यांची होती निर्मिती प्रमूख विनोद पाटील व वसंत गायकवाड यांची असून हर्षल पाटील सूत्रधार आहेत. यात गोविंद मोकासी, श्रद्धा कुलकर्णी, सुदिप्ता सरकार, अंजली धुमाड, वरूण नेवे, योगेश पाटील, राहूल कासार, अक्षय दुसाने, रोहित बोरसे, मानसी आसोदेकर, जयश्री पाटील, वंदना नेमाडे, पियूषा नेवे हे कलावंत होते . सदर याकार्यक्रम सर्वांसाठी खूला होता रसिकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला


