Home Cities जळगाव प. वि. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केली उत्कृष्ट परेड

प. वि. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केली उत्कृष्ट परेड

0
117

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | के.सी.ई.सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थिनीनी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे होणाऱ्या शासकीय कार्यक्रमा प्रसंगी उत्कृष्ट अशा परेडचे सादरीकरण करून दर्शकांचे मन वेधून घेतले.

इयत्ता चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी भारतीय सैनिकांची वेशभूषा करून दिमाखात ड्रिल मार्चिंग केले. या परेडची कमांडर म्हणून भूमिका गरुड , सुपर नंबरी म्हणून शक्ती लोहार तर दर्शक म्हणून पूर्वा बारी या विद्यार्थिनी कार्य केले.

उपशिक्षक योगेश भालेराव तसेच पोलीस ड्रिल चे निर्देशक सोपान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी सराव केला व आलेल्या पाहुण्यांची मने जिंकली. पोलीस बँड पथकाच्या ठेक्यावर आपली पाऊल टाकत मोठ्या ऐटीत आपले पथसंचलन केले. सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांचे मार्गदर्शन लाभले.


Protected Content

Play sound