Home Cities जळगाव जळगावात उद्या शास्त्रीय गायिका सुनीता टिकारेंच्या स्वरसंध्येचे आयोजन

जळगावात उद्या शास्त्रीय गायिका सुनीता टिकारेंच्या स्वरसंध्येचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सूर संगम संगीत मंचातर्फे दि.२८ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता स्वरसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका गान सरस्वती स्व.किशोरी आमोणकर यांच्या मुंबई येथील शिष्या सौ.सुनीता टिकारे ह्या आपल्या सुरांच्या मैफिलीतून शास्त्रीय गायन व सुगम संगीताचे सादरीकरण करणार आहेत.

अ.भा.औषधी विक्रेता संघ व महाराष्ट्र राज्य औषधी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढ दिवसा निमित्त सुरसंगम मंचातर्फे हा कार्यक्रम आयोजित तर जळगाव जिल्हा मेडीसीन डीलर्स असोसिएशन तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे .तसेच ला.ना. शाळा जळगाव व नंदादीप अभासिका यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले आहे.

स्वरसंध्येचा कार्यक्रम २८ जानेवारी मंगळवार रोजी सायंकाळी ७ वाजता भैय्यासाहेब गंधे हॉल येथे वेळेवर सुरू होणार असून संगीत रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.

शहरातील सर्व संगीत प्रेमी रसिकांनी या स्वरसंध्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुरसंगम संगीत मंचातर्फे नितीन बापट, पियूष रावळ, प्रवीण गगडाणी, दुष्यंत जोशी, नंदू पाटील, प्रा. राजेंद्र देशमुख, प्रल्हाद चौधरी, विशाल भावसार, प्रसाद जोशी, संपदा छापेकर, विशाखा देशमुख, विद्या भंगाळे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound