Home Cities यावल दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात हसन तडवींची नियुक्ती

दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात हसन तडवींची नियुक्ती


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येत्या २६ जानेवारी रोजी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरिता महाराष्ट्र राज्यातील जलजीवन मिशन अंतर्गत उत्तम कार्य करणाऱ्या अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, धुळे, जळगाव,नंदुरबार, सांगली या जिल्ह्यातील पाणी समितीच्या सदस्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

जलजीवन मिशन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नवी मुंबई येथे कार्यरत आदिवासी कुटुंबातील हसन तडवी हे दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळा करिता जल जीवन मिशन अंतर्गत नोडल अधिकारी म्हणून काम बघणार आहेत. सदरचे कामकाज जल जीवन मिशनचे अभियान संचालक व अतिरिक्त अभियान संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली करतील.


Protected Content

Play sound