Home क्राईम भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

0
123


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिव कॉलनी येथील नेहेते हॉस्पिटल समोर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना १९ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात कारचालकावर रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील रहिवासी गोविंद जोशी वय-३३ हे आपल्या पत्नी मोनिका जोशी यांच्या सोबत १९ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता दुचाकी क्रमांक जीजे ०५ एचझेड ३६८८) ने शिव कॉलनीतून जळगाव शहरात येत असताना मागून येणाऱ्या अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गोविंद जोशी हे जखमी झाले त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भात मंगळवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनवणे ह्या करीत आहेत.


Protected Content

Play sound