भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील शिवाजी नगरात घर खाली करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी होवून एकमेकांना शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता घडला आहे. याप्रकरणी १८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात परस्परविरोधात एकुण ९ जणांविरोधात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील शिवाजी नगरात अनिल हरगोविंद सिंधवाणी वय-६० आणि प्रविण अशोक अग्रवाल वय ३४ असे दोन कुटुंबिय वास्तव्याला आहे. दोघांच्या परिवारात शनिवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घर खाली करण्यावरून वाद निर्माण झाला. यात पहिल्या कुटुंबातील अनिल सिंधवाणी यांच्यासह शृती हरगोविंद्र सिंधवाणी आणि क्रीश अनिल सिंधवाणी यांना मारहाण करून जखमी करत त्यांच्या घरातून ३ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याचे सांगण्यात आले. तर दुसऱ्या परिसरातील प्रविण अग्रवाल यांच्यासह अशोक अग्रवाल,शोभा अग्रवाल, आरती अग्रवाल, कैलास अग्रवाल आणि सोनी अग्रवाल सर्व रा. शिवाजी नगर, भुसावळ यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे मंगळसुत्र आणि रोकड असा एकुण २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जबरी चोरून नेले. असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पहिल्या कुटुंबातील अनिल सिंधवाणी यांच्यासह शृती हरगोविंद्र सिंधवाणी आणि क्रीश अनिल सिंधवाणी तर दुसऱ्या कुटुंबातील प्रविण अग्रवाल यांच्यासह अशोक अग्रवाल,शोभा अग्रवाल, आरती अग्रवाल, कैलास अग्रवाल आणि सोनी अग्रवाल सर्व रा. शिवाजी नगर, भुसावळ असे एकुण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.