Home Cities धरणगाव धरणगाव नगरपरिषदेची अतिक्रमण व प्लास्टिक विरोधात धडक कारवाई

धरणगाव नगरपरिषदेची अतिक्रमण व प्लास्टिक विरोधात धडक कारवाई


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव शहरातील मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण वाढल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढणेबाबत नागरिकांकडून मागणी होत होती. त्याअनुषंगाने आज १८ जानेवारी रोजी धरणगाव नगरपरिषदेने नियोजन करून प्रथमतः फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करून त्याठिकाणी अतिक्रमित फेरीवाल्यांना स्थलांतरीत केले.त्यामुळे मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

नगरपरिषदेने गेल्या पंधरा दिवसांपासून फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करून त्या ठिकाणी स्थलांतरित होनेबाबत सूचना दिली होती.त्यानुसार आज नगरपरिषदेने विशेष मोहीम राबवित सर्व फेरीवाल्यांना नियोजित ठिकाणी स्थलांतरित केले. आजच्या कारवाईमुळे मोकळा झालेला मुख्य रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होवू नये यासाठी नगरपरिषदेने विशेष पथक नियुक्त केले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषद मार्फत करण्यात येत आहे.

नगरपरिषदेमार्फत प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यात येत आहे. प्लास्टिक पिशवी व कॅरीबॅग यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे आज नगरपालिका तर्फे प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये एकूण 24 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. व 50 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. अशीच मोहीम नगर परिषदेद्वारे सातत्याने राबविण्यात येणार असल्याने नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या कॅरीबॅग यांचा वापर टाळावा तसेच उघड्यावर कुठेही कचरा टाकू नये आपल्या दुकानाचा घराचा कचरा घंटागाडीतच टाकावा असे आव्हान मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले. आजची मोहीम मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हेबतराव माधवराव पाटील स्वच्छता निरीक्षक, रवींद्र गांगुर्डे व आरोग्य विभागातील सर्व मुकादम,सफाई कर्मचारी यांनी यशस्वीरीत्या राबविली.


Protected Content

Play sound