Home धर्म-समाज फैजूपर येथे स्वामीनारायण मंदिरात सप्ताह पारायणाचे आयोजन

फैजूपर येथे स्वामीनारायण मंदिरात सप्ताह पारायणाचे आयोजन

faizpur link
faizpur link

faizpur link

फैजपूर प्रतिनिधी । श्री स्वामीनारायण मंदिराच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त अमेरिकेतील वडताल संस्थान अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वामीनारायण मंदिरात श्री स्वामीनारायण भगवान यांच्या पवित्र वचनामृत ग्रंथावर सप्ताह पारायण 5 जुलै ते 12 जुलै दरम्यान सुरु आहे.

कथावाचक सावदा स्वामीनारायण गुरुकुलचे अध्यक्ष स्वामी भक्तीप्रकास दासजी श्रवण करीत आहेत. अमेरिका व परिसरातील 28 राज्यातील हिंदू धर्मातील नागरिक यांना धार्मिक, आध्यत्मिक विषयी गोडी निर्माण व्हावी. हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी अखंडित 35 वर्षांपासून या परिसरात कथेचे आयोजन करण्यात येते. असे स्वामी भक्तिप्रकाश दास यांनी सांगितले. स्वामी भक्तिप्रकाश दास शाश्त्री 30 वर्षांपासून सहा महिने भारतात असतात व सहा महिने अमेरिकेत धार्मिक आध्यत्मिक कार्यक्रमासाठी जातात. कार्यक्रमाचे अध्यक्ष वडतालधिपती 1008 आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज आहेत. सत्संग महासभा प्रमुख नवतम प्रकाश स्वामी, स्वामीनारायण संप्रदाय खान्देश माऊली स्वामी धर्मप्रसाद शाश्त्री, न्यू जर्शीचे महंत रामस्वामी, हरिप्रकाश स्वामी, गुणसागर स्वामी, रघुनंदन स्वामी मंदिर प्रमुख, विश्स्वास्थ यांची उपस्थिती राहील. कथेअंतर्गत महाविष्णू यज्ञ, रक्तदान शिबीर सामाजिक, आध्यत्मिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. कार्यक्रमासाठी मंदिर कर्मचारी विश्व्स्त परिश्रम घेत आहेत.


Protected Content

Play sound