धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील रेल्वे स्थानकात नवीन डीआरएम पंकज सिंग, व ए डी आर एम तिवारी, सीनियर डीसीएम अभय सिंग, सीएमआय अमळनेर पंकज पांडे, संदीप गुप्ता सर, ए डी एन संजय गुप्ता सर आरपीएफ अधिकारी व इतर अधिकारी यांनी स्टेशनचे अमृत योजनेअंतर्गत कार्याचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. त्या प्रसंगी डीआरएम पंकज सिंग यांना खान्देश प्रवासी असोसिएशन धरणगाव यांच्याकडून खालील दिलेल्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
1. भुसावळ ते पुणे वाया धरणगाव-अमळनेर-नंदुरबार-पुणे नवीन गाडी सुरू करणेबाबत…
2. 19005/06 सुरत भुसावल पॅसेंजर यांच्या वेळेत बदल करणे बाबत..
3. धरणगाव येथे 19045/46 ताप्ती गंगा एक्सप्रेस व 19483/84 बरोनी एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत
4. 09051/52 &09049/50 ही गाडी भुसावळ दादर गाडी कायमस्वरूपी करणे संदर्भात
5. धरणगाव स्टेशन अमृत भारत योजनेअंतर्गत प्लान विषयी सूचना
6. 59075/76 भुसावल नंदुरबार ही गाडी सुरत पर्यंत करणे संदर्भात
7. अमळनेर येथे प्रेरणा एक्सप्रेस व गाड्यांना थांबा मिळणे बाबत..
8. 19105/06 भुसावळ उधना या गाडीला भोणे स्टेशन येथे थांबा मिळणे बाबत
9. LC No RUB 137 141,142&145&147 या बोगद्यांमध्ये पाणी भरण्याच्या, व रस्त्याच्या समस्या
अशा विविध मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. त्याप्रसंगी खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश तिवारी, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव अँड. नंदन पाटील भा.ज पा. जिल्हा उपाध्यक्ष अँड. संजय महाजन, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार सदस्य अँड. युवराज रायपूरकर, जतिन नगरिया, नारायण महाजन, प्रशांत भाटिया, संभाजी सोनवणे झेड आर युसीसी मेंबर प्रतीक जैन आदी उपस्थित होते