जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जय हनुमान सांस्कृतिक मंडळ व जुने बहुउद्देशीय मंडळातर्फे श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन जुने जळगाव परिसरातील बादाम गल्ली, विठ्ठल पेठ येथे करण्यात आले आहे.
या भागवत कथेला 15 जानेवारीला सुरुवात होणार असून कथेची सांगता 22 जानेवारीला होणार आहे. या कार्यक्रमात काकडा आरती पहाटे साडेपाच वाजता होणार आहे. त्यानंतर दुपारी एक ते पाच दरम्यान भागवत कथा व संध्याकाळी साडेपाच वाजता हरिपाठ झाल्यानंतर रात्री आठ वाजता किर्तन होणार आहे.
22 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता भव्य शोभायात्रा काढली जाणार असून संध्याकाळी पाच वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन जय हनुमान सांस्कृतिक मंडळ व जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.