Home Cities अमळनेर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला मारहाण

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला मारहाण


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर अमळनेर शहरातील प्रताप कॉलेज समोर मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला एकाने तोंडावर मारहाण करून जखमी केल्याची घटना १० जानेवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जतीन भटू पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयासमोर जतीन हा मित्र कल्पेश विजय खैरनार याला घेण्यासाठी दुचाकीने गेला होता. त्यावेळी महाविद्यालयाच्या समोर कल्पेश खैरनार याचे राधे लखन जाधव रा. झामी चौक, अमळनेर याच्या सोबत भांडण सुरू होते. त्यावेळी जतीन पाटील हा दुचाकी थांबवून मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेला. याचा राग आल्याने राधे जाधव याने शिवीगाळ करत जतीन याला बेदम मारहाण करून दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जतीनची आई भाविता पाटील यांनी अमळनेर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारा राधे जाधव याच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक साळुंखे हे करीत आहे.


Protected Content

Play sound