धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुका वैद्यकीय आघाडी आणि दुर्दम्य प्रतिष्ठानच्या “सेवा परमो धर्म” या तत्त्वानुसार रुग्णसेवा करणाऱ्या रुग्णवाहिकेने १ लाख किलोमीटर अंतराचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला. या उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेचे संस्थापक कैलास माळी, सचिव मंदार चौधरी, संतोष सोनवणे, तसेच रुग्णवाहिका चालक नानुभाऊ बागुल आणि प्रकाश भाऊ मराठे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभात कैलास माळी यांनी भविष्यात कर्डियाक अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, या रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळाले असून त्यांचे प्राण वाचवण्यात मोठी मदत झाली आहे.
कार्यक्रमाला धरणगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद डहाळे, वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शैलेश सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष डॉ. मनोज अमृतकर, शहराध्यक्ष सचिन पेंढारे, चिटणीस डॉ. नरेंद्र पाटील, उपतालुका अध्यक्ष डॉ. चेतन पाटील यांच्यासह डॉ. चेतन भावसार, डॉ. प्रशांत भावे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. सूचित जैन, डॉ. अतुल शिंदे, डॉ. पंकज अमृतकर आणि गणेश पाटील उपस्थित होते. रुग्णवाहिकेच्या चालकांनी वेळेचे बंधन न पाळता तातडीच्या सेवेमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचवले गेले आहेत. या सेवा कार्याचा गौरव करत, उपस्थितांनी संस्थेच्या पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम रुग्णसेवा हेच ईश्वरसेवेचे सर्वोच्च रूप असल्याचे अधोरेखित करणारा ठरला. “सेवा परमो धर्म” या तत्त्वावर आधारित कार्य भविष्यातही अविरत सुरू राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.