वरणगावात १६ दिव्यांगांना साहित्य वाटप; रोजगारासाठी साधनांचा वापर करण्याचे आवाहन

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिव्यांग बांधवांनी शासनाकडून मिळालेल्या साहित्याचा विकास आणि रोजगारासाठी उपयोग करावा, असे प्रतिपादन जळगाव समाज कल्याण अधिकारी एस.पी. गणेशकर यांनी केले. वरणगाव येथील एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या सौजन्याने १६ दिव्यांगांना सायकल, व्हीलचेअर आणि इतर साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात गणेशकर म्हणाले की, दिव्यांग बांधवांनी बचत गट स्थापन करून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. शासन विविध योजनांद्वारे कर्ज उपलब्ध करून देते, ज्यामुळे दिव्यांग स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि कुटुंबाचा विकास करू शकतात.

कार्यक्रमाला समाज कल्याण अधिकारी देविदास चौधरी, मुकुंद गोसावी, ज्योती गुरव, समुपदेशक विद्या सोनार, प्रल्हाद सोनार आणि दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सुनील शेटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला वरणगाव दिव्यांग संघटनेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

साहित्य वितरण लाभार्थींची यादी :

सायकल: समाधान दामोदरे, नितीन पाटील, चेतन झांबरे, सुनील महाजन, राजेंद्र माळी.
व्हीलचेअर : विनोद देशमुख, समिनाबी खान.
कर्णमशिन: भिमराव माळी, कविता शिवरामे, मालताबाई कोलते, संजय महाजन, मोहिनोद्दिन शेख, देवेंद्र नाथ.
काठी: अलीम खान, रमेश बाविस्कर, अशोक राजहंस.

कार्यक्रमात टाटा एआयजी, स्वस्ती फाउंडेशन आणि एनएमपी+ पुणे यांच्या सहकार्याने दिव्यांगांना मोफत ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, आणि जीवनज्योती विमा प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सोनवणे यांनी केले, तर आभार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सुनील शेटे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिनेंद्र सेतवाल, देविदास चव्हाण, शेख अब्दुल, राजेश मांडव गणे, सुनील पाटील, संतोष पाटील, संतोष देशमुख, रामा शिवरामे, बबलू परदेशी, किशोर धनगर, रफिक शेख, राजू माळी, गणेश माळी , सुकराम माळी, विद्या सोनार, रमेश बाभुळकर , त्रिवेणी राऊत, भारती बाई थोरात, योगीता खडसे, सविता भोई, भारत सोनवणे, देविदास चौधरी, सविता माळी, रामा शिवरामे, विजय चौधरी आदी वरणगाव दिव्यांग बांधवानी परिश्रम घेतले .

Protected Content