डॉ. आचार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केला कलागुणांचा अविष्कार

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाने आजच्या दुसऱ्या पुष्पात संत एकनाथ व संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रसंग व नृत्याचे सादरीकरण केले.

यात संत एकनाथांचे अभंग, ओवी, गीत, तसेच गाडगे महाराज यांच्या जीवनातील प्रसंग, स्वछतेचा संदेश यातून देण्यात आला.वाघ्या मुरळी, गोंधळ, दिंडी, अहिल्यादेवी यांचा पोवाडा, गवळण, इ गीतांचे सादरीकरण झाले, संत परंपरा या थीमवर भक्त वेडा भगवंत हे उत्साहात संपन्न झाले.

पूर्व प्राथमिक विभागाची कार्यक्रमाची सुरुवात ही श्रीरामदास स्वामी लिखित सुखकर्ता दुखहर्ता या आरतीने होऊन पंढरीचा पांडुरंग नाचू लागला, तुळस हिरवीगार ठकडा रुपेश सुंदर अशा विविध गाणी सादर करत विठ्ठल नामाची शाळा भरवत भक्तीमय वातावरणात विठ्ठलाचा जयजयकार केला गेला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून द्वारका उद्योग समूहाचे प्रमुख भास्कर बोरोले,माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे डॉ चौधरी, माजी विद्यार्थी डॉ.तुषार चौधरी, विवेकानंद प्रतिष्ठान च्या उपाध्यक्षा सौ. हेमलता अमळकर, सचिव विनोद पाटील, कोषाध्यक्ष्या डॉ. पल्लवी मयूर, माजी अध्यक्षा श्रीमती शोभा ताई पाटील,सदस्य कुशल गांधी, मुख्याध्यापिका सौ. योगीता शिंपी, कल्पना बावस्कर, समन्वयिका सौ. रोहिणी कुलकर्णी, सौ. सिमा पाटील यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमासाठी रंगतरंग प्रमुख श्री योगेश पाटील यांनी नियोजन केले.

Protected Content