सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील जेहरा मॅरेज हॉलच्या जवळ श्लोक रेस्टॉरंट आणि लॉजींगचे भव्य उदघाटन होत आहे.
सावदा येथील सापकर परिवाराची मालकी असणाऱ्या श्लोक रेस्टॉरंट व लॉजींगचा शुभारंभ शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे. यानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सौ. ज्योती रवींद्र भास्कर सापकर यांच्या हस्ते रेस्टॉरंटचे लोकार्पण करण्यात येऊन याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. येथे अतिशय स्वादीष्ट असे शुध्द शाकाहारी खाद्य पदार्थ उपलब्ध राहणार असून फॅमिलीसाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे.
श्लोकच्या माध्यमातून सावदा येथे अतिशय दर्जेदार असे फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉजींगची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. परिसरातील नागरिकांनी याचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन सौ. ज्योती रवींद्र भास्कर सापकर, सौ. शिवानी परितोष रवींद्र सापकर, प्रियंका पियुष रवींद्र सापकर, आणि पूजा रवींद्र सापकर यांनी केले आहे.