Home Cities अमळनेर अमळनेर नगरपरिषदेची प्लास्टिक बंदीबाबत धडक कारवाई

अमळनेर नगरपरिषदेची प्लास्टिक बंदीबाबत धडक कारवाई

0
139


अमळनेर (प्रतिनिधी): प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी अमळनेर नगरपरिषदेकडून धडक कारवाई करण्यात आली. १२० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या चार दुकानदारांवर एकूण ११ हजारांचा दंड आकारण्यात आला. यावेळी २.५० किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला.

अमळनेर नगरपरिषदेने प्लास्टिक विरोधी पथकाने हजुरी रेस्टॉरंट आणि साई रेस्टॉरंट येथे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या साठवून ठेवल्याचे आढळल्याने प्रत्येकी ५००० रुपये दंड आकारला. याशिवाय, शकील बागवान आणि शोएब बागवान यांच्यावर बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला. मुख्याधिकारी वेवोतोलू केजो (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, किरण कंडारे, शहर समन्वयक गणेश गडरी, आणि पथकातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली. पालिकेने नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर पूर्णतः बंद करून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound